कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. ही पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंत अनेक घटनांनी चर्चेत राहिली आहे. या निवडणुकीमध्ये ५०.०६ इतक टक्के मतदान झाले असून २ मार्च उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने की महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर बाजी मारणार याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सट्टेबाजार तेजीत, कार्यकर्त्यांमध्ये पैजा; कसब्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशाचा अमाप वाटप करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव दिसत असल्याने अशा प्रकारचे आरोप केले जात आहे. आमचा उमेदवार विकास कामांच्या मुद्यावर विजयी होणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत अमाप पैशाचा वाटप

मी १९७९ साली पुणे महापालिकेची ते विधानसभा निवडणूक काही हजारपासून आलेला खर्च अखेरच्या निवडणुकीत पाच लाख रुपयांपर्यंत झाला. त्या सर्व निवडणुकीत कार्यकर्ता किंवा मतदारांना पैसे दिले नाही. प्रचाराकरीता लागणार साहित्य किंवा कुठे जेवण केले. तर तो खर्च आला आहे. पण काळानुरूप निवडणुकीमध्ये देखील बदल झाल्याच पाहायला मिळत आहे.आमच्या काही हजारात झालेल्या निवडणुका आता कोट्यावधी रुपयांमध्ये जात आहे.या सर्व बाबी आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचे आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी नागरिकांना भाजपकडून पैसे वाटप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर पोलीस यंत्रणा काही करताना दिसली नाही. आम्ही सर्वांनी आंदोलन केल्यावर पैशांचे वाटप करण्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.पण आजवर याच कसबा विधानसभा मतदार संघातील निवडणुक पाहत आलो आहे. २०१४ ची निवडणुक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होती.त्या निवडणुकीत राहुल गांधींच नाव कोणी घेत नव्हते. जिकडे जाईल तिकडे केवळ मोदी,मोदी म्हटले गेले.तशीच परिस्थिती या निवडणुकीत पाहण्यास मिळाली असून हेमंत रासने कोणाला माहिती नव्हते. धंगेकर आणि धंगेकर अशीच चर्चा नागरिकांमध्ये पाहण्यास मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे निवडून येतील असा विश्वास अंकुश काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा- पुणे जिल्हा परिषदेचे २०४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक; प्रशासक असल्याने संस्थात्मक कामांवर भर

तुम्ही एका खासदाराच्या जिवाशी खेळता का

लोकशाही जपण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे अस प्रत्येक लोकप्रतिनिधी सांगतो त्यामुळे खासदार गिरीश बापट मतदानाला आले.त्यामध्ये काही चूक नाही.त्यांनी मतदान करणे गरजेचे होते.तसेच मागील तीन महिन्यापासून गिरीश बापट हे आजारी असून त्यांना ऑक्सिजन सिलेंडर लावावा लागत आहे. त्या परिस्थितीत गिरीश बापट यांना प्रचाराला का आणल? २५ वर्षापासून कसबा मतदारसंघ भाजपचा किल्ला आहे. तुम्हीच असे म्हणता ना,आजारपणात गिरीश बापट यांना आणण्याच त्यामधून काय निष्पन्न करायचे होते.तुम्ही एका खासदाराच्या जिवाशी खेळता का ? असा सवाल उपस्थित करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी भाजप नेत्यावर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये धमक नाही

राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारले आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक देशाला आणि राज्याला दिशा देणारी ठरणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचा विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी केला. तसेच आता त्यांनी निवडणुका घेतल्या पाहिजे. केवळ तारीख पे तारीख सुरू असून एकदाच्या निवडणुका घेऊन टाका.निवडणुक घेण्याची धमक त्यांच्यामध्ये (भाजप) नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये धमक नाही.ठाण्यात महापालिका निवडणुक होऊ द्या,आदित्यसारखा एक कोवळ पोरगा तुम्हाला आवाहन देतो.ठाण्यात येऊन निवडणुक लढवायला तयार आहे. तुमच्यात धमक आहे तर राजीनामा द्या आणि त्या पोराविरोधात लढा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा- “डान्सबारचे अध्यक्ष शेट्टींप्रमाणे संजय राऊतांना शिक्षा द्यावी”, गुलाबराव पाटलांची मागणी

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव दिसत असल्याने अशा प्रकारचे आरोप

या निवडणुकीत दोन्ही बाजूने पैशांचे वाटप झाले आहे.अशा प्रकारच विधान अंकुश काकडे यांनी केले आहे.ही बाब पोलीस आणि निवडणुक निर्णय अधिकार्‍यांना दाखवून निर्देशनास आणून द्यायची होती.या निवडणुकीत सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम केल्याचा आरोप अंकुश काकडे यांनी केला आहे. त्या विधानांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच ज्या दिवशी प्रचार संपला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात नव्हते.

आमच्याकडून पैशाचा वापर केला गेला नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत देखील रवींद्र धंगेकर यांनी असेच आरोप केले होते. तसेच या निवडणुकीत रवींद्र धंगेकराना पराभव दिसत असल्याने अशा प्रकारचे आरोप केले जात आहे. आमचा उमेदवार विकासाच्या मुद्यावर निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokesperson sandeep khardekar criticizes ncp spokesperson ankush kakade svk 88 dpj
First published on: 01-03-2023 at 17:16 IST