पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सतत वादग्रस्त विधान केली जात आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चा काढला जात आहे. या मोर्चाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून शिव जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे किंवा शिवनेरी गडावर पायी चालत जाणे असो, त्यातून त्यांनी त्यांची भावना दिसून येते. तसेच महापुरुषांबद्दलच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करीत नाही. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महापुरुषांना मानणारा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व जण काम करीत आहोत. तसेच कोणत्याही विधानाचे किंवा कृतीचा निषेध नोंदविला जावा. मात्र आजचा मोर्चा हा राज्यपालांच्या विरोधात नसून हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले काम करत असल्याने त्याच्या भीतीपोटी हे मोर्चे काढले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: MVA Mahamorcha Live: “हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”, ‘महामोर्चा’मध्ये संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “रावण गाडण्यासाठी…!”

तसेच ते पुढे म्हणाले की, ते विकासाच्या मुद्यावर कधी बोलू शकत नाही. त्यांनी कधीही विकासाचा कधी अजेंडा दिला नाही. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाली आहे. या बुलेट ट्रेनमुळे महाविकास आघाडीमधील नेते हताश झाले असून हे दोघे जर १८ तास काम करीत राहिले तर महाविकास आघाडी संपल्या शिवाय राहणार नाही.

हेही वाचा: MVA Mahamorcha : मुंबईच्या रस्त्यांवर लोटला जनसागर! उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महामोर्चात सहभागी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निराशेपोटी आणि भावनिक मुद्याला हात घालून हा मोर्चा काढला गेला आहे अशा शब्दात महाविकास आघाडीच्या मोर्चावर त्यांनी टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्यांवर बोलायचं असेल किंवा चर्चा करायची असल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ात या ,आम्ही त्यांना विकास दाखवून देऊ,असे आव्हान देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना बावनकुळे यांनी दिले.मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला आहे. पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे. हे त्यांच दुखणं असून त्या भीतीने हे मोर्चे निघत असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यावर त्यांनी निशाणा साधला.