राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे.पण राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघ चर्चेत आहेत.या मतदार संघातून महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे.या निवडणुकीत कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.या निवडणुकीच्या कालावधीत दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.

हेही वाचा >>> राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष… आता होणार काय?

रोहित पवार हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष लढविणार होते. असे विधान अजित पवार यांनी जाहीर सभेत विधान केले होते.या विधानाचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेत म्हणाले की,मी जिल्हा परिषदेची निवडणुक माझ्या कुटुंबीयांच्या आणि मतदाराच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे.तसेच मी अपक्ष निवडणुक लढणारच नव्हतो. दादा ५० टक्के खर आणि ५० टक्के खोट बोलत आहेत.पूर्वी दादा १०० टक्के खर बोलत असायचे, भाजपच्या प्रभावामुळे आता ५०/५० टक्क्यावर आले आहेत. तर आणखी दहा दिवसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखी अजितदादाची भाषण होतील.शरद पवार हे मुख्यमंत्री होते का ? त्यांनी काय काम केली असे देखील ते विचारतील,त्यामुळे भाजप हा एक व्हायरस आहे.आता तो व्हायरस अजितदादांना लागला आहे. तो जर व्हायरस वाढत गेल्यास,दादांना राजकीयदृष्टय़ा खूप मोठ्या अडचणींना सामोरे जाव लागु शकते,असा टोला अजित पवारांना त्यांनी लगावला.

हेही वाचा >>> पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब

तसेच ते पुढे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक भागात प्रचारा निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत आहे.सुप्रिया सुळे यांच्या बाजूने नागरिक मोठ्या संख्येने असून या निवडणुकीत आम्हाला सुरुवातीच्या काळात तीन लाख मताधिक्याने येतील असे वाटत होते.मात्र सध्याचा प्रतिसाद पाहिल्यावर चार लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील,असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना (सुनेत्रा पवार,अजित पवार) सोसायटीच्या लेव्हलवर जाऊन प्रचार करावा लागत आहे.जो भाजपचा हेतू होता,तो यातून सफल झाल्याच दिसून येत असल्याच त्यांनी सांगितले.