पिंपरी- चिंचवड : ऐकावं ते नवलच आहे. पिंपरीत भररस्त्यात असलेल्या ड्रेनेजमध्ये भरधाव स्कुटी अडकली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाल नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षरश: स्कुटीच पाठीमागील चाक थेट ड्रेनेजमध्ये गेल्याने स्कुटी उभी राहिली आहे. यावरून शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था असल्याची चर्चा आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभ नगर बस स्थानकाच्या समोर रस्त्याच काम सुरू आहे. हा रस्ता वर्दळीचा असून वाहतूक सुरू असते. याच रस्त्यावर ड्रेनेज आहे. त्याच झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत सुचना फलक लावलेला नाही. तिथून वाहन जात असताना थेट ड्रेनेजमध्ये अडकत आहेत. भरधाव चारचाकी आणि दुचाकी वाहन अडकत आहेत.

भरधाव स्कुटी अडकल्याने चालकाची तारांबळ उडाली. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी झाल नाही. यानंतर चारचाकी भरधाव टेम्पोच देखील चाक ड्रेनेजमध्ये अडकले होत. वाहन ड्रेनेजच्या खड्ड्यातून काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरूस्त करणाऱ्या ठेकेदाराने ड्रेनेज असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावणं गरजच आहे. अन्यथा अपघाताची ही मालिका सुरूच राहील.