पुणे : रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी अजित पवार यांनी केली. तटकरे यांच्या नावाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असातना त्याबाबत मात्र अजित पवार यांनी उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवताना अपेक्षित उमेदवार असेल, असे पवार यांनी जाहीर मंगळवारी केले.

Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
Sunil Tatkare, property,
सुनील तटकरे यांच्याकडे १४ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
(As Utkarshan Rupwate of Congress did not get the nomination from Shirdi Constituency, he met Prakash Ambedkar the President of Vanchithan at Rajgriha in Mumbai )
शिर्डीत काँग्रेसच्या उत्कर्षां रूपवते ‘वंचित’च्या संपर्कात

हेही वाचा >>>दहावी, बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली. उर्वरीत नावे येत्या गुरुवारी (२८ मार्च) मुंबई येथे जाहीर करण्यात येणार आहेत.सुनील तटकरे रायगडचे विद्यमान खासदार आणि प्रदेशाध्यक्ष आहेत. या घोषणेमुळे रायगडमध्ये तटकरे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे माजी खासदार अनंत गिते अशी लढत होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. या मतदारसंघात विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना आढळराव यांचे आव्हान असणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या संभाव्य उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीमध्ये आल्याने जानकर बारामतीमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार असेल, याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट बोलणे टाळले. उर्वरीत उमेदवारांची नावे गुरुवारी जाहीर होणार आहेत. बारामतीमधून अपेक्षित नाव असेल, असे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील, याचे स्पष्ट संकेत दिले.