पुणे: दूरचित्रवाहिनीवरील कलाकार कपिल शर्मा बोलत असल्याचे सांगून महिलेशी अश्लील संवाद साधणाऱ्या एकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला घोरपडीतील सोपानबाग परिसरात राहायला आहे. ती कल्याणीनगर भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. कपिल शर्मा असे नाव सांगणाऱ्या आरोपीने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सुरुवातीला महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधून तिच्याशी अश्लील संवाद साधला.

हेही वाचा… करोना काळात गैरव्यवहार: तत्कालीन महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारतींसह तिघांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला त्रास देत होता. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.