राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या विषयी समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर टाकल्या प्रकरणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ॲड. पूनम गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असा समूह तयार करण्यात आला होता. ॲड. गुंजाळ यांना समुहात सहभागी होण्यासाठी विनंती पाठविण्यात आली होती. ॲड. गुंजाळ यांनी मैत्रीचीविनंंती स्वीकारल्यानंतर रुपाली पाटील यांचे छायाचित्र वापरून बदनामीकारक मजकूर टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर ॲड. गुंजाळ यांनी महिलांविषयी बदनामीकारक मजकूर टाकू नका, असे समुहावर सांगितले.

सुधीर लाडने त्याच्या वैयक्तिक समाजमाध्यमातील खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ॲड. गुंजाळ यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

“लवकरच आम्ही सर्व महिला एकत्र येऊन विकृतांच्या घरी जाऊन जोडे सत्कार ही करणार,” असा इशारा रुपाली टील-ठोंबरे यांनी फेसबुकवरुन दिलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करत आहेत.