लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोंढावा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अझहर तांबोळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर विधानसभा मतदार संघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत. अझहर तांबोळी आणि साथीदारांनी समाज माध्यमात जगताप यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. तांबोळी आणि साथीदारांनी दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.