भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली. उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेनेला दरवेळी डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच पाच राज्यांच्या निवडणूक कधी घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. त्यात भाजपाची काही भूमिका नाही, असंही त्यांनी नमूद केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “पाच राज्यांच्या निवडणूक कधी घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. त्यात भाजपाची काही भूमिका नाही. शिवसेना उत्तर प्रदेश, गोव्यात निवडणूक लढवते आहे. दरवेळी शिवसेनेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात.”

“संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतं”

“संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतं. ते म्हणतात तसं की विरोधी पक्षातील नेत्यांना तलवारीच्या जोरावर धरुन आणलंय की पैशाच्या जोरावर धरुन आणलंय? मग हे तुम्हाला का जमत नाही,” असा सवालही चंद्रकांत पाटलांनी राऊतांना विचारला.

हेही वाचा : मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले “ऐन तरुणाईतील १३…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विमानतळासाठी खूप वेळ लागणार, लोहगाव विमानतळामधील सुविधा वाढवाव्यात”

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “भाजपच्या काळात नक्की करण्यात आलेल्या विमानतळाच्या जागेला स्थानिकांनी विरोध केला, तर नवीन जागेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे निवृत्त एअर व्हॉईस मार्शल भुषण गोखले यांना विमानतळासाठी पुण्याभोवती ४-५ जागा निवडण्याची जबाबदारी देण्यात यावी. त्याचबरोबर आत्ताच्या लोहगाव विमानतळामधील सुविधा वाढवाव्यात. कारण विमानतळासाठी खूप वेळ लागणार आहे.”