पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाने टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत भाजपा नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा! लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी

काय म्हणाले चंद्रकात पाटील?

“शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा – नाशिक निवडणुकीत राष्ट्रवादीने काम न केल्याने मविआचा उमेदवार पडला का? नाना पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

“जगताप कुटुंबियांमध्ये कोणताही वाद नाही”

दरम्यान, उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. “लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विन जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाकडून उमेदवारांची घोषणा

दरम्यान, भाजपाने आज पुणे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.