अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह २ जुलै रोजी शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला. पण भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राज्यातील अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलने केलीत.

या सर्व घडामोडीदरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी विरोधात असो की सत्तेत कोणत्याही नेत्याबद्दल असंस्कारी शब्द कधीही मान्य केले नाही. यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज दिली, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अबब…गणपती बाप्पांपुढे चांद्रयान मोहिमेचा भला मोठा देखावा! साकारली २५ ते ३० फूट उंचीची प्रतिकृती

हेही वाचा – भीती दाखविण्यासाठी महिलेची आत्महत्येची धमकी; काडी ओढून पतीने पेटवून दिल्याचा प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणार्‍या व्यक्तीला एक प्रतिष्ठा आहे. कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत असो की विरोधात असो, आम्ही सत्तेचा उन्माद करणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळीदेखील स्पष्ट भूमिका होती आणि आताही आहे. कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे अजित पवार यांचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, असे बावनकुळे म्हणाले.