शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांच्या भूमिकेला छावा संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. “या आमदारांविरोधात जी भाषा वापरली जात आहेत. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जर त्यांच्या हातात बांबू असतील, तर आमच्या हातामध्ये तलवारी असतील एवढच त्यांनी लक्ष ठेवावे. आमचे हजारोंच्या संख्येने छावे विमानतळावर या आमदारांच्या रक्षणासाठी असणार आहेत.”, असे अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे.

नानासाहेब जावळे म्हणाले, “आज शेतकरी अडचणीत आहेत. राऊतांसारख्या लोकांकडून या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना आवर घातला पाहिजे, अन्यथा या महाराष्ट्रातील मराठा समाज राऊत सारख्या लोकांना ठोकून काढल्या शिवाय राहणार नाही. ही भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.”

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “एकनाथ शिंदे यांचे बंड नसून सर्वसामान्यांसाठी राजकीय क्रांती करण्यास एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे हजोरा कार्यकर्ते विमानतळावर जाणार आहेत. राऊत सारख्या माणसांनी यापुढे मराठ्याबाबत बोलताना थोडंस भान ठेवावं. ” असंही जावळे यांनी यावेळी सांगितलं.