पुणे: महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड-शो करत प्रचार केला. तेरा तारखेला विरोधकांचे बारा वाजवणार अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे. शहरातील चाफेकर चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. साडेतीन ते चार तास चाललेल्या रॅलीमध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा : पुण्याला आता नवीन पुण्याची गरज…नितीन गडकरी म्हणाले, “विमानतळावर स्वारगेटसारखी गर्दी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्रिक नक्की करतील. बारणे यांना मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते. अबकी बार आप्पा तिसरी बार खासदार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिली. मावळमध्ये ७५ ते ८० टक्के मतदान झाल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ असे यावेळी शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात तिन्ही टप्प्यामध्ये महायुती सर्वात पुढे असून ४५ पार जागांवर जिंकणार असल्याचा विश्वास, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महिलांनी १३ तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हावं, त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना मतदानासाठी पाठवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि विधान सभेत महिलांना आरक्षण दिलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये संसदेत आणि विधानसभेत महिला दिसतील, असंही शिंदे म्हणाले.