आज राज्यभरात छत्रपती शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, संभाजी राजेंच्या नाराजीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर संभाजीराजेंची जाहीर नाराजी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी…”

काय म्हणाले मुख्यमंत्री?

शिवनेरीवर शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला कोणालाही बंद नाही. अशी बंदी असू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पाईक आहोत. आता तर शिवाजी महाराजांचा मावळा या या राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या ज्या काही सुचना आहेत. त्या जनतेच्या हिताच्या आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा”, संजय राऊतांच्या आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “बेताल बडबड…”

”शिवरायांच्या दर्शनापासून कोणीही वंचित राहणार नाही”

आज शिवनेरी किल्ल्यावर जो नियोजनाचा अभाव जाणवला आहे. ज्या त्रृटी राहिल्या असतील, त्या त्रृटी नक्कीच दूर केल्या जाईल. प्रशासनाला तशा प्रकारच्या सुचना निश्चितपणे दिल्या जातील. कोणालाही शिवरायांच्या दर्शनापासून वंचित ठेवल्या जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा – “माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी राजेंच्या नाराजीवर फडणवीसांचीही प्रतिक्रिया

तत्पूर्वी यासंदर्भात बोलताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो आहोत आणि आज मानाने जगतो आहोत. म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण येत असतो. आज छत्रपती संभाजीराजे यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशही दिले आहेत.”