लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: खडकवासला परिसरातील कालव्यात‌ पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना घडली. गेल्या महिनाभरात कालव्यात बुडून तीन जण मृत्युमुखी पडले आहेत.

राहुल भगवान येवले (वय २३, रा. सिंहगड महाविद्यालय परिसर, मूळ रा. बहिरवाडी, ता. नेवासा, अहमदनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाचे जवान, तसेच स्थानिक तरुणांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. राहुल आणि त्याचे पाच मित्र सुट्टी असल्याने रविवारी कालव्यात पोहण्यासाठी खडकवासला परिसरातील यशवंत विद्यालयाजवळ आले होते. राहुल आणि आणखी एकाला पोहता येत नव्हते. त्यामुळे ते कालव्याच्या कडेला थांबले होते. राहुलचे मित्र कालव्यात पाेहत हाेते. मित्रांना पोहताना पाहून राहुल कालव्यात पाेहण्यासाठी उतरला. पाेहता येत नसल्याने ताे कालव्यात बुडाला. तो बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याबराेबर असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, पीसीएम आणि पीसीबी गटातून एकूण २८ विद्यार्थ्यांना शंभर परसेंटईल

हवेली पाेलीस ठाण्यातील हवालदार विलास प्रधान यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी राहुलचा शाेध घेतला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शाेध घेण्यासाठी माेहीम राबविण्यात आली. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही.