पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेवटची धरपड सुरू असून अस्तित्व दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ते प्रक्षोभक भाषण करत आहेत. ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने लोक दिसत आहेत. असा हल्लाबोल ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांबाबत केलेल्या भाष्यावर बोलताना महाजन म्हणाले की, एका महिन्यात निवडणुका घ्या हे शक्य आहे का? उद्धव ठाकरे हे अस्वस्थ आहेत. कालच्या मेळाव्याच्या भाषणात ते भडक बोलत होते. लोकांना अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्याकडे काहीच राहील नाही. 40 आमदार, 12 खासदार पक्षातून निघून गेले आहेत. शिवसेना त्यांच्या हातातून निसटली आहे. लोक देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाजूने आहेत. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे केवळ प्रक्षोभक भाषण करून अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ही शेवट ची धरपड आहे अस मी म्हणतो, ग्रामपंचायत निवडणूक पाहिली तर ते शेवटच्या नंबरवर आहेत. त्यामुळं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे अस महाजन म्हणाले आहेत. 

हेही वाचा : मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाही, मुख्यमंत्री शिंदे हे कुठे मौजमजा करण्यास फिरत नाहीत – शंभूराज देसाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदांता प्रकल्पा बाबत बोलताना ते म्हणाले की, वेदातांने पत्र देऊन ही महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही. वायनरीच्या बाबत मिटिंग घेतली, पण वेदांताच्या बाबत मिटिंग घेतली का? कोणाला बोलावलं का? त्यामुळं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांना तुम्ही रेड कारपेट टाकलं का? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. शिंदे- फडणवीस सरकार येताच पहिली भेट वेदांताची घेतली. अग्रवाल यांनी सांगितलं होतं की आम्हाला इथं राहायचं नाही. हे आमचं सरकार येण्यापूर्वी त्यांच बोलणं झालं होतं. अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघले नाहीत, बैठक तर सोडाच. मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. आमदार, खासदारांना भेटले नाहीत.