पुणे: कंपनी सचिव अभ्यासक्रम राबवणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) ६ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. संगणकीय पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आयसीएसआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कंपनी सचिव अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीएसईईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेत चार विषय आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी १२० मिनिटे असतील. संगणकाद्वारे प्रॉक्टर्ड पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा तत्सम साधनाचा वापर करून त्यांच्या सोयीच्या ठिकाणाहून परीक्षा देणे शक्य होणार आहे.

हेही वाचा… पिंपरी: बिबट्या लोकवस्तीत कसा आला? वनाधिकारी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अर्धा तास लॉग इन करावे लागणार आहे. या परीक्षेला नकारात्मक गुणदान पद्धती लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना https://icsi.edu/ या संकेतस्थळाद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.