काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सेवा कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमाच्या समारोपास काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी गटनेते आबा बागूल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा वादावरून सतत विधान करीत आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत विधान करून दोन्ही राज्यात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची विधान करीत आहे.यामुळे दोन्ही राज्यात वातावरण खराब करण्याच काम ते करीत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांची बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे.अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीला जाण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आपल्या राज्याची भूमिका मांडावी,असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुण्यातील काँग्रेस भवनच्या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची दांडी; पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर

भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जातात. कालच चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विधान केले आहे.त्यामुळे विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, निवडणुका आल्या की, भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची आठवण होते.त्यांच्या नावावर मत मागितली जातात.पण निवडून आल्यानंतर अशा प्रकारची विधान केली जातात.या सर्व नेत्यांचा आम्ही निषेध करतो.तसेच कालच चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे.ते पाहिल्यानंतर त्यांच भान राहिलेलं नाही.हे लक्षात येत असून आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करीत आहोत, त्याच बरोबर शिक्षण संस्था उभी करतांना मदत मागितली असेल तर त्याला तुम्ही भिक म्हणणार का ? ते काय बोलतात त्याचा त्यांना संयम राहिलेला नाही.आपण अशा नेत्यांना धडा शिकवायला पाहिजे.अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा बाळासाहेब थोरात यांनी खरपूस समाचार घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader balasaheb thorat slams cm eknath shinde over maharashtra karnataka border issue zws 70 svk
First published on: 10-12-2022 at 17:00 IST