लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : काँग्रेसतर्फे नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवारी (दि. ४ मार्च) दुपारी साडेतीन वाजता महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिंदे म्हणाले, ‘राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर पूर्णपणे शासनाचे नियंत्रण आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन बिघडलेले आहे. सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचे प्रश्न आणि महापालिकेतला भ्रष्टाचार वाढत आहे.’