कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, आता त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. हीच परिस्थिती चिंचवडमध्ये पाहण्यास मिळेल का? त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “प्रयत्न करण हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात यश आले आहे. चिंचवडमध्ये देखील तो प्रयत्न सुरू असून, यश आले तर ठीक, अन्यथा समोर जायचे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अजित पवार पुढे म्हणाले की, माजी आमदार मोहन जोशी यांनी माझी भेट घेतली असून, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी रविवारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – कसबा, चिंचवडसाठी ‘होऊ दे खर्च’; उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा २८ वरून ४० लाखांवर

सर्व सामन्यांचे मुख्यमंत्री सर्वदूर पोहोचले

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. मी त्यांचा टाईम्स स्क्वेअर ठिकाणी फ्लेक्स पाहिला. आपल्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअरवर साजरा होत आहे, सर्व सामन्यांचे मुख्यमंत्री सर्वदूर पोहोचले, अशी मिश्कीलपणे टिपणी अजित पवार यांनी केली.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाहिरातबाजीवर सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती समोर आली. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, हे सर्व सामन्यांचे सरकार आहे. जाहिरातबाजी केल्याशिवाय सर्व सामन्यांना कसे कळणार. त्यावर लवकरच भूमिका मांडणार आहे. मी देखील अर्थमंत्री म्हणून काम केल आहे. कुठे खर्च केला पाहिजे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे, जो दुर्लक्षित वंचित वर्ग आहे, त्या करिता खर्च केला पाहिजे, असे ते म्हणाले.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना ‘बेस्ट ऑफ लक’

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, त्याबद्दल त्यांना शुभेछा, ‘बेस्ट ऑफ लक’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा – “या घटनेमागील मास्टर माईंड शोधला पाहिजे”, आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी..”

कोयता गँगविरोधात म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात अद्यापही कोयता गँगची चर्चा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात कोयता गँगबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोयता गँगविरोधात कारवाई सुरू केली असून, एक तर तडीपार किंवा मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.