पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाने १३३ जागांवर सहायक प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास ५५ टक्के जागा रिक्त आहेत. शासनाकडून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होते. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या विविध क्रमवारतील विद्यापीठाच्या स्थानावरही त्याचा परिणाम दिसून आला. गेल्यावर्षीही विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली होती. आता यंदाही पुन्हा ही प्रक्रिया राबवली जात आहे. कंत्राटी भरतीमुळे विद्यापीठ निधीवर ताण निर्माण होत आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : ६० लाख खर्च करून मुलीचा धुमधडाक्यात केला विवाह; सासरच्यांनी केला छळ, पती करायचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!

हेही वाचा >>>पिंपरीतील जुन्या जलनिस्सारण वाहिन्या, नाल्यांचे होणार सर्वेक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाने सहायक प्राध्यापकांच्या १३३ जागांवर कंत्राटी नियुक्तीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान, आंतविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील चाळीस शैक्षणिक विभागांतील जागांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी दरमहा ४० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ३१ मे २०२४पर्यंत असेल. या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत २० जुलै आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत आरक्षणनिहाय जागा, पात्रता, नियम-अटी याबाबतच्या सूचना माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.