पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, याप्रकरणाचा तपास १४ दिवसात होणार नाही. संबंधित गुन्हा गंभीर स्वरुपाचे असून, सखाले तपास करणे गरजेचे आहे. सखोल तपासातून खुनामागचे निश्चित कारण समजेल, असे निरीक्षण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी नोंदविले. आंदेकर खून प्रकरणात रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या १२ आरोपींना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने बुधवारी दिले.

हेही वाचा >>> पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी, खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय ३१), तुषार अंकुश कदम (वय ३०, दोघेही रा. आंबेगाव पठार), दीपक किसन तोरमकर (वय २९), आकाश बापू म्हस्के (वय २४, सर्व रा. आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय २६, रा. येवलेवाडी), विवेक प्रल्हाद कदम (वय २५, रा. आंबेगाव पठार), उमेश नंदू किरवे (वय २६, रा. आंबेगाव पठार), ओम धनंजय देशखैरे (वय २०, रा. आंबेगाव पठार), साहिल बबन केंदळे (वय २०, रा. दत्तनगर), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय १९, रा. आंबेगाव पठार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी खून प्रकरणात प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१), संजीवनी कोमकर (वय ४४, दोघेही रा. नानापेठ), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७), जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२, दोघेही रा. भवानी पेठ), सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, रा. आंबेगाव पठार) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली असून, पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींनी पिस्तूल, कोयते कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. सखोल तपास करणे गरजेचे आहे, अशी माहिती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालयात दिली. आरोपींनी कट रचून आंदेकर यांचा खून केला. तपासासाठी १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नीलिमा यादव – इथापे यांनी युक्तिवादात केली. या गुन्ह्याचा ‘केस डायरी’त तांत्रिक त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. कायद्यात असलेल्या नियमांनुसार केस डायरी तयार करण्यात यावी. तपासाची माहिती देणाऱ्या बाबी त्यात क्रमानुसार असाव्यात, असे आदेश न्यायालायने दिले.