पुणे : कौशल्यपूर्ण शहर अभियंते तयार व्हावेत, या हेतूने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आता भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासंदर्भात क्रेडाई पुणे मेट्रो आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे (व्हीआयआयटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे आणि व्हीआयआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त भरत अगरवाल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबद्दल रणजीत नाईकनवरे म्हणाले की, पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा आलेख भविष्यात चढता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून आलेल्या अभियंत्यांमध्ये प्रकल्प ठिकाणी होणाऱ्या कामाचा अनुभव व अपेक्षित कौशल्य नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळावे, शिवाय हे ज्ञान पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जात प्रात्यक्षिक आणि कौशल्याधारीत प्रशिक्षण देणारे असावे, हा विचार करण्यात आला. त्यातून हा कार्यक्रम सुरू होत आहे.

हेही वाचा : …अन् अबकी बार श्रीरंग बारणे खासदार; बारणेंवर स्वतःच घोषणा करण्याची आली वेळ! चर्चेला उधाण

भरत अगरवाल म्हणाले की, शैक्षणिक आणि उद्योगसंस्था यांनी एकत्र येत काम करायला हवे, अशी मागणी वारंवार केली जाते. क्रेडाईच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळणे ही आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयत्न असून, यामध्ये आम्ही सहभागी आहोत. या उपक्रमाद्वारे नवअभियंत्यांना सामावून घेणारी परिसंस्था तयार होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : तीन वर्षांनंतर जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक पूर्ववत

असा असेल प्रशिक्षण कार्यक्रम…

  • अभियांत्रिकी पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच प्रात्यक्षिक
  • प्रकल्प ठिकाणच्या प्रशिक्षणाचा अनुभव
  • विद्यार्थ्यांना पाचव्या सहामाही सत्रापर्यंत प्रशिक्षण पूर्ण करता येणार
  • बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी दोनशे तास काम करण्याची संधी