लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका लष्करी जवानाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा-आईला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला…
बळीराम माधवराव सुट्टे (वय ३५, मूळ रा. बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बळीराम भोपाळ येथील इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नियुक्तीस आहे. पीडित महिला त्याच्या ओळखीतील आहे. बळीराम महिलेच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने महिलेचे नकळत मोबाइलवर चित्रीकरण केले. ते प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. बळीराम याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.