लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. महिलांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असून, या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नवले पूल परिसरात रस्त्याच्या कडेला थांबून काही महिला देहविक्रय करत आहेत. अश्लील हावभावामुळे या भागातील रहिवाशांना त्रास होत होता. या भागातून जाणाऱ्या सामान्य महिलांना याचा त्रास व्हायचा. रस्त्याच्या कडेला थांबून देहविक्रय करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी सिंहगड रस्ता पोलिसांकडे वेळोवेळी केली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नव्हती. नवले पूलाजवळ सेवा रस्त्यावर वर्दळ जास्त आहे. या भागात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. पोलिसांकडे नागरिकांनी तक्रार करून पाठपुरावा केला होता. अखेर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्या आठ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट

याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नवले पूल परिसरात रात्री थांबलेल्या महिलांकडून नागरिकांना त्रास देण्यात येण्यात आहे. त्या अश्लील हावभाव करत असल्याची तक्रार उपनिरीक्षक जायभाय यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन आठ महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

आणखी वाचा-महायुतीतील नाराजांचा ‘मावळ पॅटर्न’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देहविक्रय करणऱ्या महिलांविरुद्ध यापूर्वी कारवाई करण्यात यायची. त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून त्यांना सुधारगृहात पाठवले जायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा महिलांकडे पीडित म्हणून पाहिले जायचे. सिंहगड रस्ता पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर नवले पूल परिसरात थांबणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने या परिसरातील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी माहिती देण्यात आली.