कोरेगाव भीमा परिसरातील पेरणे फाटा येथील  ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात झाली. भीम अनुयायांनी अभिवादनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन हा कार्यक्रम पार पडत आहे.

हेही वाचा- पुणे : नळस्टॉप चौकात सुशोभीकरण; वाहतूक कोंडीला निमंत्रण

रविवारी (१ जानेवारी) पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना देण्यात आली. सकाळी आठनंतर अभिवादन स्थळ सर्व अनुयायांना अभिवादनाकरिता खुले करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महसूल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), समाज कल्याण आयुक्तालय,  महावितरण, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यासह विविध विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे सकाळी सहा वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

हेही वाचा- कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त; ७० जणांना उपस्थित राहण्यास मनाई

 स्तनदा मातांसाठी यंदा प्रथमच हिरकणी कक्ष

अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महिलाची संख्या विचारात घेता लहान बाळांना स्तनपानासाठी स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष यंदा प्रथमच स्थापन करण्यात आला आहे.

आरोग्य दूत संकल्पना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्तंभ ते वाहनतळाचे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य दूत’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकी वरील आरोग्य दूत तात्काळ आरोग्य सेवा देतील, आरोग्य विभागाची ही संकल्पना नव्याने येथे अंमलात येत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.