शहरात सोमवारी झालेल्या अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवली. शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. त्याचा फटका दुचाकी आणि चारचाकींना बसला. पाणी गेल्याने बिघाड झालेल्या वाहनांची आता दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी होऊ लागली आहे. 

हेही वाचा >>>पुणे : चोरीचा जाब विचारल्याने दुकानदाराला बेदम मारहाण ; मंगळवार पेठेतील घटना

दिवाळी तोंडावर आलेली असताना परतीच्या पावसाने सोमवारी शहराला झोडपले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही तडाखेबंद पाऊस झाला. शहरातील चौकांमध्ये पाणी साचले, रस्त्यांवरून पाणी वाहू लागले, सोसायट्यांच्या तळघरात पाणी साचले. त्यामुळे वाहनांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडले. वाहनांत पाणी गेल्याने त्यात बिघाड होऊन नोकरदारांचा खोळंबा झाला. या वाहनांच्या दुरुस्तीसाठी दिवसभर गॅरेजमध्ये गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.  

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>>पुणे : फरार अमली पदार्थ तस्कर वर्षभराने गजाआड ; मेफेड्रोनसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक दुचाकींमध्ये पाणी गेल्याचे प्रकार घडले. त्यातही बेसमेंटमध्ये असलेल्या दुचाकींना जास्त फटका बसला. त्यामुळे दुचाकींमध्ये पाणी जाऊन त्या बिघाडल्या.या बिघाडलेल्या दुचाकी दुरुस्तीला येत आहेत. साधारणपणे प्रत्येक दुचाकी गॅरेजमध्ये चार-पाच दुचाकी दुरुस्तीसाठी आहेत, असे  स्कूटर मोटर रिपेअरर्स अँड रिसर्च असोसिएशनचे अध्यक्ष हरीश अनगोळकर आणि रमेश इंगळे यांनी सांगितले.