scorecardresearch

Premium

पिंपरी- चिंचवड: अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार गटाचा सायकल दौरा!

पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने शरद पवार गटाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट तरुणांपर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेतली आहे.

Cycle tour of Sharad Pawar group
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांपर्यंत शरद पवार पोहोचवण्याचा प्रयत्न?(फोटो- लोकसत्ता टीम)

पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने शरद पवार गटाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट तरुणांपर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेतली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार गट सायकल दौरा करत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचून तरुणांपर्यंत शरद पवार यांचे विचार पोहोचवण्याचे सध्या काम करत आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल दौरा राबविण्यात आला आहे.

पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. हे कदापि नाकारता येऊ शकत नाही. गेली पाच वर्ष भाजपाने पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता काबीज केली. यामुळे अजित पवार हे काही प्रमाणात अस्वस्थ झाले होते. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे त्यांच्या सभांमधून बोलून देखील दाखवली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि पिंपरी- चिंचवड पुन्हा एकदा अजित पवारांना मिळालं असं बोललं जात आहे. परंतु, राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने शहरातील शरद पवार गटाने देखील शुड्डू ठोकला असून शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.

Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
Bhaskar Jadhav vs Chhagan Bhujbal
“जामिनावर बाहेर असल्यामुळं…”, भुजबळांनी ओबीसी मेळाव्यातून माघार घेतल्यानंतर भास्कर जाधवांची टीका
ajit pawar marathi news, ajit pawar rohit pawar, rohit pawar ed notice marathi news,
“आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…
Voter List Election
नाशिकमध्ये वर्षभरात एक लाखहून अधिक मतदार बाद का झाले?

आणखी वाचा-“आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार गटाने सायकल दौरा आयोजित केला, याद्वारे ते महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये जात तरुणांमध्ये शरद पवार यांचे विचार पोहोचवण्याचे काम करत आहेत. यामुळे शरद पवार गटाला काही प्रमाणात का होईना सहानुभूती भेटण्याची शक्यता आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादीचा पक्ष उभा करत आहेत. यात विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग असला पाहिजे असं मत शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी व्यक्त केले. शरद पवार यांचं शहरातील शिक्षणासंदर्भात मोठे योगदान आहे. त्यांनी पिंपरी- चिंचवड शहराचा चेहरा बदलण्याचं काम केलं. नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम केलं. त्यामुळे नव्या पिढीने शरद पवार यांना समजून घेतल्यास ते आगामी काळात कधीही संकटांना घाबरणार नाहीत अस मत शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व्यक्त केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cycle tour of sharad pawar group against ajit pawar group kjp 91 mrj

First published on: 08-10-2023 at 11:20 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×