पुणे : संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बावधन भागात घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसून नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सायली वासुदेव बट्टे (वय २४, रा. झाशीनगर, चंद्रपूर रस्ता, गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. सायली गडचिरोलीमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची कन्या आहे.

हेही वाचा >>> पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली गेल्या वर्षभरापासून पुण्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला होती. कामाच्या अतिताणामुळे गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईक पुण्यात आले. सायलीचा भाऊ काही दिवस पुण्यात राहत होता. तो नुकताच गडचिरोलीला परतला होता. सद्या ती एकटी राहत होती. शनिवारी (१८ मार्च) तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायलीने कुटुंबीयांशी साधलेला संवाद अखेरचा ठरला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.