महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेले सगळे आरोप खोडून काढले आहेत. आज अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मीरा बोरवणकर यांनी जो प्रसंग सांगितला त्यावेळचा शासन निर्णयच वाचून दाखवला. इतकंच नाही तर पु्स्तकात इतर अनेक गोष्टी आहेत मात्र माझ्यावरच फोकस का केला जातो? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनीही (मीरा बोरवणकर) सांगितलं की त्यात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे पण सगळ्यांनी हाच विषय का लावून धरला हे कळायला मार्ग नाही. मला वाटतं पुस्तक लिहिताना वगैरे काहींना वाटतं की प्रसिद्धीसाठी खळबळजनक गोष्टी लिहिल्या की त्याला वेगळी प्रसिद्धी मिळते. त्यात लगेच विरोधी पक्षातल्या लोकांनी चौकशी करा वगैरे सुरु केलं. पण तो त्यांचा अधिकार आहे. या प्रकरणाची चौकशी करा किंवा अजून काहीही करा मला काही घेणंदेणं नाही. माझी कुठल्याही कागदावर सही केलेली नाही. कुठल्याही मिटिंगला मी हजर नव्हतो. असं म्हणत अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांना टोला लगावला. तसंच माझा आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही.

हे पण वाचा- “संजय दत्तला वाटलं होतं कुणीतरी त्याचा एन्काऊंटर…”, मीरा बोरवणकर यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

माझं काम भलं आणि मी भला

“माझं काम भलं आणि मी भला असं करत मी पुढे जात असतो. गेले तीन चार दिवस सातत्याने माध्यमांत बातम्या आल्या. मी त्या बातम्यांना जास्त महत्त्व दिलं नाही. त्या बातम्यांशी माझा दुरान्वये संबंध नाही. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अपवाद मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता. ज्या जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी असते त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावे असा माझा प्रयत्न असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी काहीही केलं नाही

पालकमंत्री या नात्याने आढावा बैठका घेतो. अनेक बैठका घेत असतो. त्या कामाला कशी गती देता येईल, काही समस्या असतील तर सोडवता कसे येतील, याचा प्रयत्न असतो. एखादं काम होत नसेल तर ते का अडलेलं आहे यासाठी विविध विभागातील आढावा घेतो. म्हणून पुण्यातही मी आढाला बैठका घेत असतो. आता एका रिटायर्ड आयपीएस ऑफिसरने पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातून सातत्याने काहीतरी बातम्या येऊ लागल्या. यातून अजित पवार अडचणीत, चौकशी करा. पण, मी काहीही केलं नाही”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.