सणसवाडीत अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू

आर्थिक वादातून घटना घडल्याचा संशय

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे : शिरुरजवळील सणसवाडी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर आज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात हा तरुण जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गंगाराम बाबुराव दासरवड (वय २६, सध्या रा. सणसवाडी) हा तरुण दुचाकीवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि ते फरार झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेला गंगारामचा जागीच मृत्यू झाला. गंगाराम सणसवाडीतील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यामध्ये जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम करीत होता. ही घटना आर्थिक वादातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Death of a youth on firing by unknown assailants in sanswadi

ताज्या बातम्या