राज्यातील भटके आणि विमुक्त जाती-जमातींचे अधिवेशन ११ डिसेंबर रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाश शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचे अध्यक्ष हरि सावंत, जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता व साजिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना भटके आणि विमुक्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबितच आहेत. त्याकडे या अधिवेशनातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत; महारेल रेल्वेमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भटके आणि विमुक्त जाती जमातीच्या नागरिकांना दाखले मिळण्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात, सरकारी जमिनींवरील वसाहती नियमित कराव्यात, लघुउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, बेरोजगारांना रोजगार द्यावा, वसंतराव नाईक महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, या मागण्या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. समाजातील नागरिकांना विकासाची दिशा देण्यासाठी कार्यरत समाज सेवकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असेही आयोजकांनी सांगितले, असे सावंत यांनी सांगितले.