पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पालिकेचे नुकसान करणारे निर्णय रद्द करावे, चुकीच्या प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी, असेही भापकरांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई (३६२ कोटी रुपये), पिंपरी पालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीची निविदा (३१२ कोटी रुपये), स्मार्ट सिटी अमृत योजना, त्याच सल्लागारांना मुदतवाढ देणे, स्पर्श घोटाळ्यातील भूमिका, डॉ. अनिल रॉय कारवाई प्रकरण, मोशी कचरा डेपो आग प्रकरण, करोना काळातील श्वानांचे निर्बीजीकरण, वैद्यकीय विभागामार्फत डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक नियुक्त करणे, शिक्षण मंडळाचे शालेय साहित्य वाटप प्रकरण, स्वच्छतेच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च करणे. स्मार्ट सिटीच्या कामांची मंजुरी, अधिकाऱ्यांची पदोन्नती, नोकरभरती, वाढीव खर्च, थेट पद्धतीची कामे अशा काही निर्णयांची चौकशी करण्याची मागणी भापकरांनी केली आहे.