राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. अनेक वर्षांपासूनचे भाजपा-शिवसेना पक्षांची युती तुटून महाविकासआघाडी निर्माण झाली. अडीच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे सरकार कोसळलं आणि भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. आता राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणं तयार होताना दिसत आहेत. मागील काही काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेत्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अशातच पत्रकारांनी फडणवीसांना भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती होणार का? असा सवाल केला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे युती होणार का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हणाले, “आमच्याकडे तर चर्चा नाही, माध्यमांमध्येच जास्त चर्चा दिसत आहे.”

अमित शाहांचा मुंबई दौरा, राज ठाकरेंच्याही घरी जाणार का?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमित शाह दरवर्षी गणपतीला मुंबईत येतात. ते या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतात. ते येणार असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की आपली बैठकही झाली पाहिजे. त्यानंतर ते एका शाळेचं उद्घाटनही करण्यास जाणार आहेत. एवढाच त्यांचा कार्यक्रम आहे. या व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही कार्यक्रम नाही. कुठलीही पतंगबाजी करू नये.”

पुणे मनपाचं विभाजन होणार का?

भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी दोन महापालिकांबाबत भूमिका घेतल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

“नवनवीन वादाचे विषय कशाला काढता?”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नवनवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा पुणे महानगरपालिकेचं विभाजन करायचं तेव्हा करू. आज तरी राज्य सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो हे खरं आहे. मात्र, आज तरी असा प्रस्ताव आलेला नाही.”

“वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे,” असं म्हणत फडणवीसांनी अशी मागणी करणाऱ्यांना सूचक टोला लगावला.

“अशोक चव्हाणांबाबतचं वृत्त चुकीच्या आधारावर”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त चुकीच्या आधारावर आहे. अशी कोणतीही परिस्थिती नाही. अशोक चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही एकत्र काम करत आहोत.

हेही वाचा : पुण्याचं विभाजन करून दोन महापालिका होणार? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या भेटीचा असा अर्थ लावणं योग्य नाही”

“अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रियपणे सहभागी होत आहेत. ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने मित्राकडे गेले. तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली. म्हणून त्याचा असा अर्थ लावणं योग्य नाही. अशोक चव्हाण आणि आम्ही काँग्रेसची बांधणी करण्यासाठी काम करत आहोत आणि काम करत राहू,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.