पुणे : रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बसमधून डिझेल चोरुन नेण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसटी बसचालक रमेश पोटभरे (वय ५२, रा. एसटी काॅलनी, पुणे-सातारा रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटभरे हे पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून १७ जून रात्री प्रवाशांसह तुळजापूरला निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावाजवळ एसटी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एसटी बसचालक पोटभरे आणि वाहकाने बस ताम्हाणे वस्ती परिसरातील एस फोर जी हाॅटेलसमोर रात्री लावली. एसटी बस बंद पडल्याने त्यांनी प्रवाशांना दुसऱ्या बसमधून जाण्यास सांगितले. हाॅटेलसमोरील मोकळ्या जागेत त्यांनी बस लावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेजारी एक टँकर लावण्यात आला होता. चोरट्यांनी मध्यरात्री एसटी बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून त्यातील डिझेल चोरले, तसेच शेजारी लावलेल्या टँकरच्या टाकीचे झाकण उघडून चोरट्यांनी डिझेल चोरले. एसटी बस आणि टँकरमधून एकुण मिळून १८० लिटर डिझेल कॅनमध्ये भरुन चोरटे पसार झाले. चोरलेल्या डिझेलची किंमत ३० हजार रुपये असून, पोलीस हवालदार सातपुते तपास करत आहेत.