पुणे : अवकाशातील दूरच्या अंतरावरील मरणासन्न रेडिओ आकाशगंगांचा खगोलशास्त्रज्ञांनी शोध घेतला आहे. अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे. येत्या काळात जीवनचक्राच्या अंतिम टप्प्यातील रेडिओ आकाशगंगांची उत्क्रांती नियंत्रित करणारे घटक समजून घेण्यास, मृत स्त्रोत त्यांच्या यजमान आकाशगंगा आणि आंतरगॅलेक्टिक माध्यमात किती ऊर्जा पुरवतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीतील सुशांत दत्ता, वीरेश सिंग, अभिजित कायल, एनसीआरएतील ईश्वरा चंद्र, योगेश वाडदेकर, ऑक्सफर्ड विद्यापीठातील इयान हेवूड यांचा संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध ॲस्ट्रोफिजिकल जर्नल या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. या संशोधनासाठी जपानमधील सुबारू, पुण्याजवळील खोडद येथील जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), नेदरलँडमधील लो-फ्रिक्वेंसी ॲरे (लोफार), अमेरिकेतील व्हेरी लार्ज ॲरे (व्हीएलए) या दुर्बिणींचा, तसेच डीप मल्टी-फ्रिक्वेंसी सर्वेक्षणाचा वापर करण्यात आला.

हेही वाचा – पुणे: वेश्याव्यवसायाचा आरोप करुन खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांवर गुन्हा

केवळ रेडिओ निरीक्षणांद्वारे ओ‌ळखल्या जाऊ शकणाऱ्या रेडिओ आकाशगंगा मोठ्या प्रमाणात रेडिओ प्रारण उत्सर्जित करतात. हे प्रारण आकाशगंगेच्या मध्यभागी दोन ध्रुवांमधून उत्सर्जित होणारे असते. उच्च तापमानाचे आयनीकृत प्रारण लाखो प्रकाश-वर्षांचा अंतराळ प्रवास करून विश्वातील सर्वात मोठी संरचना तयार करतात. यजमान आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिप्रचंड आकाराच्या कृष्णविवरावर (सुपरमासिव्ह ब्लॅक होल) सामग्रीच्या वाढीमुळे जेट्स चालवले जातात आणि सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियसची (एजीएन) उपस्थिती दर्शवतात. गॅलेक्टिक न्यूक्लियसची सक्रियता थांबल्यावर प्रारण उत्सर्जित होत नाही. मात्र सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियसच्या रेडिओ प्रारण प्रारणांच्या अवशेषामुळे अदृश्य रेडिओ आकाशगंगा शोधल्या जाऊ शकतात. मोठ्या संख्येने रेडिओ आकाशगंगांच्या प्रतिमा आणि स्पेक्ट्राचा अभ्यास करून संशोधक जवळपास दोन डझन रेडिओ आकाशगंगा ओळखण्यात यशस्वी झाले. सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्लियसमध्ये (एजीएन) क्रिया नसलेल्या प्रारणातून अवशेष उत्सर्जन दिसून आले. न्यूटन लार्ज स्केल स्ट्रक्चर या अवकाश निरीक्षण पद्धतीनुसार एका लहान आकाशगंगासमुहामध्ये मरणासन्न आकाशगंगा शोधण्यात आल्या.

हेही वाचा – पिंपरी : रहाटणीत पावणेदोन लाखांची रोकड जप्त

भविष्यातील अभ्यासासाठी चाचणी

स्क्वेअर किलोमीटर ॲरे (स्का) दुर्बिणीसह भविष्यातील अभ्यासासाठी चाचणी म्हणून हे संशोधन उपयुक्त ठरण्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला. हा अभ्यास भारताचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघाद्वारे तयार केलेल्या सर्वात मोठ्या रेडिओ इंटरफेरोमेट्रिक ॲरे टेलिस्कोपद्वारे केला जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery of dying radio galaxie astronomers joint research pune print news ccp 14 ssb
First published on: 25-02-2023 at 21:21 IST