पुणे : बांगडीला असलेले लटकन खेळताना चुकून तीन वर्षांच्या मुलीच्या नाकातून थेट फुप्फुसात गेले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर ब्रॉन्कोस्कोपी करून श्वसननलिकेला इजा न होता ती वस्तू बाहेर काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले आहे.

या मुलीला ताप आणि खोकल्याचा त्रास झाल्याने तिला पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मुलीला श्वास घेताना उजव्या बाजूच्या श्वसननलिकेद्वारे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नसल्याचे निदर्शनास आले. तिच्या उजव्या बाजूच्या फुप्फुसाचे आकारमान लहान होऊन ते अकार्यक्षम झाल्याचे निदान झाले. त्यानंतर फुप्फुसाचा संसर्ग वाढला.

mangalsutra female cleaner marathi news
नाशिक: सापडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या स्वाधीन, महिला सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा
chaturang , infidelity
ईतिश्री : थोडीसी बेवफाई?
Mohammed Shami Breaks Silence On Marriage
Mohammed Shami : ‘तुमच्यात जर दम असेल…’, मोहम्मद शमी सानिया मिर्झाबरोबरच्या लग्नाच्या अफवांवर संतापला
Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
A 32-year-old youth was swept away by the flow of Sheldi Dam in Khed
मित्रांच्या डोळ्यासमोर धरणात वाहून गेला ३२ वर्षीय तरुण! थरारक घटनेचा Video Viral
a father saved his childrens life from who were drowning in the flood water
शेवटी वडिलांनीच वाचवला पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या स्वत:च्या मुलांचा जीव , व्हिडीओ होतोय व्हायरल
Nashik, 80 Year Old Man Set Ablaze, Ancestral Well Dispute, Succumbs to Injuries, niphad, nashik news, niphad news, marathi news,
विहिरीच्या वादातून वृध्दाला भावाच्या कुटूंबाने जिवंत जाळले
Loksatta samorchya bakavarun Narendra Modi rule will remain in Parliament
समोरच्या बाकावरून: तरीही संसदेत राहणार मोदींचीच हुकूमत?

आणखी वाचा-ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील डॉ. समीर देवकाते गजाआड

मुलीच्या फुप्फुसाचे सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीत मुलीच्या फुप्फुसात काही तरी वस्तू अडकल्याचे दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने सुमारे आठ तास त्या चिमुकलीवर ब्रॉन्कोस्कोपीची प्रक्रिया केली. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेदरम्यान, मुलीचा श्वास सुरू ठेवण्यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मुलीच्या श्वसननलिकेला कोणतीही इजा न होता बांगडीचे प्लॅस्टिकचे लटकन बाहेर काढण्यात अखेर डॉक्टरांना यश आले.