लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉ. देवकाते यांना अटक करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Drug smuggling case Case against Mamata Kulkarni quashed by High Court
अमलीपदार्थ तस्करीचे प्रकरण : ममता कुलकर्णीविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द
Manorama Khedkar remanded in judicial custody for threatening a farmer in Mulshi with a pistol Pune
मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी
ias officer puja khedkar files harassment complaint
पूजा खेडकर यांना पोलिसांचे समन्स; छळ प्रकरणात पुण्यात येऊन जबाब नोंदविण्याचे आदेश
Pune, Pooja Khedkar, IAS trainee, Manorama Khedkar, metro officials, Mother Manorama s Altercation with Metro Officials, police, Baner, altercation, show cause notice,, video evidence, Hinjewadi-Shivajinagar metro, pune news,
मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलीस, मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी; आणखी एक चित्रफीत प्रसारित
rti activist vijay kumbhar demands inquiry against ycm doctors for giving disability certificate to ias pooja khedkar
IAS पूजा खेडकर प्रकरण: पिंपरीच्या वायसीएममधील डॉक्टरांची चौकशी करावी- आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी
acb arrested two doctors of nashik central jail for accepting bribe
नाशिकरोड कारागृहातील लाचखोरी उघड – दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी
ias pooja khedkar get disability certificate from ahmednagar district hospital
नगरच्या सरकारी रुग्णालयातून खेडकर यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र
Crime against the wife of then Deputy Director of Education case of accumulation of unaccounted assets
पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा, बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे प्रकरण

याप्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. चाकण येथे मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ललित ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित, साथीदार अरविंदकुमार लोहरे, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी कारखाना सुरू केला होता.

आणखी वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार १११ जागांवर प्राध्यापक भरती; येत्या आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध होणार

ससून रूग्णालयातून ललित मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करुन ललितच्या दोन साथीदारांना पकडले होते. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित २ ऑक्टोबर रोजी ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षात (वॉर्ड क्रमांक १६) बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता.

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली होती. त्यानंतर ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक करण्यात आली. तपासात डॉ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मरसाळे यांनी ललितकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली.

आणखी वाचा-पुण्यातील रिंगरोडच्या भूसंपादनात नवा ट्विस्ट; पाच गावे प्रकल्पातून वगळली

कारागृह रक्षक निलंबित

ललित पाटील प्रकरणात बंदोबस्तात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यता आले आहे. पाटीलला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली. कारागृह रक्षक मोईस शेख याला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे दिले. कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), येरवडा कारागृहातील समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. पाटील आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात राहून शेख याने ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.