पुणे : ज्येष्ठ लेखक, विचारवंत विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी डॉ. राजीव बसर्गेकर लिखित ‘नव्या युगाचे पाईक’ या पुस्तकाचा प्रकाशन आयोजित करण्यात आला आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त सचिव सुधीर देवरे आणि सह्याद्री फार्मर्सचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
या पुस्तकात ३५ क्षेत्रातील ३५ मान्यवरांचे लेख समाविष्ट करण्यात आलेले आहे, अशी माहिती ‘विनय ७५ हर्डीकर’ समन्वय समितीचे सदस्य विनोद शिरसाठ आणि रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.