पुणे : स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका डाॅ. श्यामला गरूड यांना यंदाचा ‘यशस्विनी साहित्य सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी (२२ जून) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून खासदार सुप्रिया सुळे, लेखक प्राजक्त देशमुख, धैर्यकन्या आसावरी जगदाळे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती केंद्राचे सचिव अंकुश काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी गडचिरोलीच्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार यांना यशस्विनी कृषी सन्मान, आदिवासी, दलित, शेतमजूर आणि भूमिहीन महिलांसाठी लढा देणाऱ्या रायगडच्या उल्का महाजन यांना यशस्विनी सामाजिक सन्मान, उत्कृष्ट पत्रकारितेसाठी मुंबईतील अलका धूपकर यांना यशस्विनी पत्रकारिता सन्मान, शेती व्यवयायातील धाराशीवच्या कमल कुंभार यांना यशस्विनी उद्योजकता सन्मान आणि अहिल्यानगरच्या कुस्ती प्रशिक्षक शबनम शेख यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान देऊन गौरविण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.