पिंपरी- चिंचवड : हिंजवडीतील जळीतकांडाप्रकरणी चालक जनार्धन हंबर्डीकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. १९ मार्च रोजी हिंजवडीतील फेज वन जवळ टेम्पो ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागली होती. हा अपघात नसून हा कट असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा जनार्धन हंबर्डीकर असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं होतं. या जळीतकांडामध्ये स्वतः आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकर देखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

१९ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास हिंजवडीतील फेज वन परिसरात टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले होते. अद्याप ही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जनार्धन हंबर्डेकरला पोलिसांनी रुग्णालयातच नजर कैदेत ठेवलं होतं. जनार्दन हंबर्डीकरचं काही कामगारांच पटत नव्हतं, तसेच दिवाळीला बोनस न दिल्यामुळे हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. आरोपी जनार्दन हंबर्डेकरने त्यांच्याच कंपनीमधून एक लिटर बेंझिन केमिकल चोरल होतं. पुण्यातून टेम्पो ट्रॅव्हल्स मधून कामगार घेऊन जात असताना त्याच परिसरात माचिस खरेदी केलं. कंपनी पाचशे मीटर जवळ येताच हिंजवडीतील फेज वन परिसरात आरोपी जनार्दन हंबर्डेकरने स्टेरिंगच्या जवळच चिंध्यावर केमिकल टाकून पेटवून दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही क्षणांमध्येच भीषण आग लागली. काही कामगारांनी धावत्या टेम्पो ट्रॅव्हल्स मधून उड्या घेतल्या. आरोपी जनार्दन हंबर्डेकरने देखील जखमी अवस्थेत उडी घेतली होती. घटनेत चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचं प्रथमदर्शी समोर येत होतं. परंतु, पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत अवघ्या काही तासातच हा कट असल्याचं समोर आणलं होतं. अद्यापही सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्या आरोपी जनार्दन हंबर्डेकरला आज न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बेंझिन केमिकल आणि चिंध्या कुठून आणल्या याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली. अशी माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे.