लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेल्या भुयारी मार्गात पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील वाहतूक दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा यावेळेत बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

शिवाजीनगर येथील वेधशाळा चौक ते न्यायालय दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. संचेती चौकात भुयारी मार्गातील पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. या वाहिनीच्या दुरस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत भुयारी मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत भुयारी मार्गातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा- पुणे महापालिकेत एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न धूसर

संचेती चौकातील भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी संचेती चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातून संगम पूलमार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकातून उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक, शिवाजी रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.