लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्याहून नेपाळला पर्यटनासाठी गेलेले ३९ पर्यटक सुरक्षित आहेत. शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे १२८ जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील पर्यटकांशी संपर्क न झाल्याने नातेवाईक चिंतेत होते. शनिवारी सकाळी पर्यटकांशी संपर्क झाल्यानंतर चिंताग्रस्त नातेवाईकांना हायसे वाटले.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

बाणेरमधील ३९ जण नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. आर्चिस टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने नेपाळ सहलीचे आयोजन केले होते. शुक्रवारी रात्री पुण्यातील पर्यटक नेपाळमधील चितवन येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने पर्यटक घाबरले. हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले सर्व पर्यटक बाहेर पडले आणि एकत्र जमले. नेपाळमध्ये भुकंप झाल्याचे समजाताच पर्यटन कंपनीने तातडीने हालचाली सुरू केल्या. मध्यरात्री पुण्यातील ३९ पर्यटक गोरखपूरकडे रवाना झाले.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक विभागाकडून कारवाईचा दंडुका

दरम्यान, नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे समजताच पुण्याातील नातेवाईक घाबरले. त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यरात्री संपर्क होऊ शकला नाही. शनिवारी पर्यटकांशी संपर्क झाल्यानंतर नातेवाईकांची चिंता दूर झाली.