मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे मला भाजप छळत आहे. त्यांना वाटत आहे, नाथाभाऊ नाउमेद होऊन पुन्हा भाजपकडे येतील. भाजप ने कितीही छळलं तरी नाथाभाऊ झुकनेवाला नहीं असा पुष्पास्टाईल टोला एकनाथ खडसे यांनी भाजप ला लगावला आहे. ते पुण्यात होत असलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना बघण्यासाठी आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ खडसे म्हणाले, भारताचा क्रिकेटचा सामना बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. या अगोदर देखील अनेक क्रिकेटची सामने बघितले आहेत.

हेही वाचा >>> “ईडी अन् सीबीआयचा सरेमिरा संपवायचा असेल, तर…”, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

टेस्ट क्रिकेट पासून वन-डे आणि टी-ट्वेन्टी हे देखील मॅच बघितले आहेत. क्रिकेटमधील मला काही समजत नाही. पाहण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. पुढे ते म्हणाले, १३७ कोटी रुपयांची महसूल विभागाकडून मला नोटीस आलेली आहे. आज तहसीलदारांनी मला नोटीस दिलेली आहे. मला या नोटिशीची कल्पना होती. हा एक राजकीय षड्यंयत्राचा भाग आहे. त्याला योग्य उत्तर देऊ. यात आमच्या गावचे विरोधक चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांचा समावेश आहे. म्हणून ते कधी ईडी कधी इन्कम टॅक्स, किंवा नाथाभाऊंची चौकशी करा म्हणून मागे लागतात. गेल्या दोन-तीन वर्षापासून माझ्या अनेक चौकशी झाल्या. त्यात काही तथ्य निघालं नाही. विरोधकांनी जंग-जंग पछाडले, की ईडीत अटक होईल,  देशातील एकमेव उदाहरण आहे की अटक न होता मला जामीन मिळाला आहे. त्यांना चपराक पडली आहे.

हेही वाचा >>> खडकवासला धरणाची सुरक्षा रामभरोसे; जलाशयात जैव वैद्यकीय कचरा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, ते एक – एक प्रकरण काढत आहेत. त्यांना ईडीत,इन्कटॅक्स काही सापडलं नाही म्हणून इतर चौकश्या लावल्या. मला एनसीपीत आल्यानंतर यांनी छळलं. एनसीपी मध्ये गेल्यानंतर नाथाभाऊ नाउमेद होईल आणि परत भाजपकडे येईल, अस त्यांना वाटत असेल. मी कायमी विरोधी पक्षात राहिलेला माणूस आहे. मी सत्तेच्या विरोधात बोलत आलेलो आहे. आत्ताही भाजपची सत्ता आहे. भाजपच्या ध्येय- धोरणामध्ये चूक असेल ती निदर्शनास आणून देणार. त्यांनी कितीही छळलं तरी मी मांडणार, नाथाभाऊ झुकणे वाला नहीं.