पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून, मतदान केंद्रे शनिवारी जाहीर करण्यात आली. मतमोजणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

बाजार समितीची निवडणूक २४ वर्षांनंतर होणार आहे. मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. १८ जागांसाठी १७ हजार ८१२ जण मतदान करणार आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वाधिक ११ उमेदवार निवडून येणार आहेत. ग्रामपंचायत गटातून चारजण, व्यापारी-आडते गटातून दोनजण आणि हमाल, मापाडी गटातून एक उमेदवार निवडून येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यापारी, आडते गटात सर्वाधिक मतदार असून, या गटातील निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर असून, व्यापारी गटातील पॅनलने कोणालाही पाठिंबा दिला नाही. या गटातील प्रत्येकी दोन उमेदवारांनी पॅनल तयार केला आहे.

मतदार संघ मतदारांची संख्यामतदानाचे ठिकाण
सहकारी सेवा संस्था१९१८ मतदार सातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर
ग्रामपंचायत ७१३ मतदारसातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर
व्यापारी, अडते१३ हजार १७४ मतदारश्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ
हमाल, तोलणार २ हजार ७ मतदारहमाल पंचायत भवन, मार्केट यार्ड