जयंत उमराणीकर

Loksatta Pune Vardhapan 2023 : गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने नागरिक नोकरी- व्यवसायाच्या शोधात स्थलांतरित होत आहे. पेन्शनरांचे शहर अशी ओळख काही वर्षांपूर्वी असलेल्या पुणे शहराचा विस्तार वाढत असून कायदा-सुव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण, वाहतूक समस्या सोडविण्याचे आव्हान पुणे पोलीस दलासमोर आहे. बदलत्या पुण्यातील पोलीस दलाने कात टाकणे गरजेचे आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी पोलीस दल सक्षम करण्यासाठी उपययोजना सुचविल्या आहेत.

Industrial Court summoned BESTs General Manager for denying alternative work to disabled drivers
‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
sarthi foreign scholarship
‘सारथी’च्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवडयादी कधी जाहीर होणार?
issues of police Deprived of medical facilities after retirement
पोलीस व्यथा-भाग ३ : सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधांपासून वंचित
around 600 officers employees of district education and training Institute deprived of salary
राज्य सरकारचेच अधिकारी, कर्मचारी हक्काच्या वेतनापासून वंचित… प्रकरण काय?
Nagpur obc pilot training
सात कोटी खर्चूनही प्रशिक्षणाचे ‘विमान’ जमिनीवरच; ओबीसी समाजातील मुलांच्या नशिबी…
Why Indian doctors prefer to go to the abroad
भारतातील डॉक्टर परदेशाची वाट का धरतात?
kalyan Municipal commissioner
कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : क्रीडानगरी

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याचा विस्तार चहूबाजूने होत आहे. नोकरी-व्यवसायाच्या शोधात मोठ्या संख्येने नागरिक परराज्यातून पुण्यात येत असून वेगाने वाढणाऱ्या पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्ह्यांची संख्या विचारात घेऊन पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षित पोलीस कर्मचारी, वाहतूक नियोजन अशा महत्त्वाच्या स्तरांवर बदल झाल्यास बदलत्या पुण्यातील आव्हाने स्वीकारण्यास पोलीस दल सज्ज होईल. राज्य गुन्हे अन्वेेषण विभागाने २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या गुन्हे अहवालात लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांमुळे पाेलीस दलासमोर आव्हान निर्माण केले असून त्याचा परिणाम थेट पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात नोकरी, रोजगाराच्या शोधात परराज्य तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात बांधकाम व्यवसाय वाढत आहे. जमिनीला सोन्याचे भाव मिळाले आहे. जमिनीवर झालेली अतिक्रमणे, भाडेकरु आणि जमीन मालकातील वाद सोडविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी गुंड टोळ्यांची मदत घेतली. बेकायदा जागा बळकावणे, भाडेकरुंना धमकावणे, विवादास्पद जमिनीत हस्तक्षेप अशा कामांमध्ये गुंड टोळ्यांचा वापर करण्यात येऊ लागला. गुंड टोळ्यांना त्यातून आर्थिक रसद मिळाली. त्यातून पुण्यात संघटित गुन्हेगारी वाढीस लागली. जागेचा वादातून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पाणी प्रश्नाचे उत्तर आपणच शोधण्याची गरज!

बांधकाम व्यवसायाबरोबर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात बेकायदा वाळू उपसा करण्यात गुंड टोळ्या सक्रिय झाला. वाळू उपसा करणाऱ्या गुंड टोळ्यांच्या म्होरके वाळू माफिया म्हणून उदयास आले. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात गुंड टाेळ्या उतरल्या. काही बांधकाम व्यावसायिकांनी सुरुवातीला गुंड टोळ्यांची मदत घेतली. त्यानंतर गुंड टोळ्या डोईजड झाल्या. बांधकाम व्यावसायिकांना धमकावनू खंडणीचे प्रकार सुरू झाले. पुणे शहर परिसरात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये सुरू झाली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीसाठी देशातील विविध भागातील युवकवर्ग पुणे परिसरात स्थायिक झाला. छोटे उद्योग ते मोठ्या उद्योगात असलेल्या संधीमुळे अप्रशिक्षित मनुष्यबळ शहरात स्थायिक झाले. अगदी किरकोळ व्यवसायात परराज्यातील युवकांनी जम बसविला. अनेकजण शहरातील झोपडपट्यांमध्ये स्थायिक झाले.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील सर्वोत्तम शहर

शहरात मोठ्या संख्येने परराज्य तसेच परगावातील नागरिक स्थायिक झाले. लोकसंख्या वाढल्यानंतर शहरातील गुन्हेगारी तसेच गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली. पुणेकर नागरिक त्यांच्या हक्कांविषयी जागरुक आहेत. नागरिकांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. महिलांच्या तक्रारी आणि नागरिकांच्या समस्यांचे योग्यपद्धतीने निराकरण गरजेचे आहे. काही तक्रारी संवेदनशील असतात. अशा तक्रारींचे निराकरण पोलिसांनी योग्यरीत्या करावे. निष्पक्ष, पारदर्शी तपास करुन नागरिकांना न्याय देणे गरजेचे आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी पोलीस कसे सोडवितात. त्यांच्याशी ते कसे वर्तन करतात, यावर पोलीस दलाची प्रतिमा ठरते. पोलिसांच्या प्रतिसादावर नागरिक त्यांची मते निश्चित करतात. शेवटी पोलीस जनतेच्या सेवेसाठी आहेत, याचा विसर पडता कामा नये. पोलीस शिपाई पोलीस दलाचा कणा आहे. एखादी घटना घडल्यानंतर सर्वात पहिले पोलीस शिपाई घटनास्थळी भेट देतात. नागरिकांशी संवाद साधतात. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहरी भागातील गुन्हे हाताळणे तसेच तपासाबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

वाहतूक व्यवस्थापन एक आव्हान शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत पुण्यात कमी आहे. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक समस्या वाढीस लागली आहेत. शहरात वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाहीत. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविणे हे पोलीस दलासमोर मोठे आव्हान आहे. चाैकट दहशतवादी कारवायांचा धोका शहरात अनेक महत्त्वाच्या लष्करी संस्था तसेच संशोधन संस्था आहेत. शहरात यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले आहेत. दहशतवाद आणि घातपाती कारवाया रोखणे पोलीस दलासमोर आव्हान आहे. चौकट अपुरे मनुष्यबळ आणि प्रशिक्षित पोलीस कर्मचारी पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या १२० ते १४५ दरम्यान आहे. संयुक्त राष्ट्र संघाने एक लाख लोकसंख्येमागे किमान २२० पोलीस कर्मचारी असावेत, असे सूचित केले होते. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरात आणखी काही पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील सर्वोत्तम शहर

पोलीस दलात पोलीस शिपाई हा घटक महत्त्वाचा मानला जातो. प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव ही देखील पोलीस दलासमोरील एक समस्या आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ गरजेचे आहे. चौकट आधुनिकीकरणाची कास पोलीस दलाने नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शास्त्रोक्त पद्धतीने तपास करुन गुन्ह्यांची उकल केल्यास न्यायालयात गुन्हा सिद्ध करणे शक्य होईल. आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे दिल्यास त्याला कठोर शिक्षा होईल. शहराच्या वेगवेगळ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, शहरातील क्षेत्रनिहाय बंंदाेबस्ताची रचना, सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक यंत्रणा, आधुनिक वाहने उपलब्ध झाल्यास गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल. पोलीस दलात विविध प्रकारच्या आधुनिक योजना राबविण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली पोलीस, मुंबई पोलिसांनी अशा योजना सुरू केल्या आहेत. नागरिकांसाठी सुरक्षा ॲप, नोकरदार महिला, बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची निरकारण करण्यासाठी पुणे पोलिसांनी योजना हाती घेतल्या आहेत. या योजना आणखी प्रभावी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

खासगी संस्थांची मदत पोलीस दलाच्या आधुनिकीरणसाठी गृहविभाग, स्थानिक पोलीस तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. इंग्लडसारख्या देशात पोलीस दलातील योजनांसाठी खासगी उद्योग, ओैद्योगिक संघटनांची मदत घेण्यात येते. वाहतूक समस्या तसेच नियंत्रणासाठी वाहतूक स्वयंसेवकांची (ट्रॅफिक वाॅर्डन) मदत घेतली जाते. नागरिकांच्या समस्या तसेच पोलीस दलातील आधुनिकीकणारसाठी सातत्याने शासन, लोकप्रतिनिधी, खासगी उद्योग, ओैद्योगिक संघटनांच्या संपर्कात राहून पाेलीस दल सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे.

जयंत उमराणीकर, माजी पोलीस आयुक्त, पुणे