डॉ. संजीव सोनवणे

Loksatta Pune Vardhapan 2023 : गतिमान बदल हाच मूलभूत मंत्र जगाचा झाल्याने शिक्षण क्षेत्र यापासून वेगळे राहू शकत नाही. शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हे तत्त्व नव्या स्वरूपाने पूर्णपणे बदलू घातले आहे. कारण समाज खूपच झपाट्याने बदलत आहे आणि शिक्षण त्याच्या मागून बदलण्यासाठी धडपडतंय, अशी काहीशा परिस्थिती उपलब्ध होणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि त्या सुसंगत समाज, उद्योग यांच्या अपेक्षा उंचावल्यामुळे झाली आहे. समाजात पूर्णपणे नवतंत्रज्ञान, माहितीजाल, स्वयंचलित उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपयोजने यामुळे मानव पर्यायी व्यवस्था प्रस्थापित होत आहे. हे सर्व बदल शिक्षण व्यवस्थेला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कल्पना करू शकणार नाही, अशी व्यवस्था शिक्षणामध्ये येत्या काळात येणार आहे. कारण भविष्यातील आव्हाने पेलवणारे पदवीधर तयार करण्यासाठी कालबाह्य तत्त्व, व्यवहार आणि साधनांनी निर्माण करणे शक्य नाही.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण

नवी अध्ययन अध्यापन केंद्र वर्गखोल्या शिकण्याचे केंद्र राहणार नाही. कोणीही कधीही कोठेही शिकू शकणार असल्याने आता वर्ग, प्रयोगशाळा, कार्यशाळा यांची आभासी रूपे हुबेहूब प्रत्यक्ष अनुभवाजवळ जाणारे अध्ययन अनुभव देण्यास सुरूवात झाली आहे आणि पुढील काळात हे अनुभव सर्वव्यापी होतील.

निष्पती आधारित कृती शिक्षण

विद्यमान व्यवस्थेतील पदवीधर खात्रीने ज्ञान स्तराचा आणि क्षमतेचा दर्जा प्राप्त केलेले आहेत याची हमी शिक्षण व्यवस्था देत नाही. गुणपत्रकावरील गुण ज्ञानस्तर, क्षमता, कौशल्य, मूल्यधारणा करण्याविषयी दर्शक नाही हे खुलं सत्य असल्याने आता पुढील काळात निश्चित अशी अध्ययन निष्पती साध्य करणाऱ्या कृतीवर भर देणारी शिक्षण व्यवस्था होऊ घातली आहे. आशयाऐवजी क्षमता प्राप्त करण्यास महत्त्व देणारे अभ्यासक्रम व मूल्यमापन पध्दती प्रत्येक पदवी / पदव्युत्तरसाठी क्रमप्राप्त असतील व त्यातून पदवीचे मूल्य (व्हॅल्यू ऑफ ग्रॅज्युएट्स ) क्षमता, ज्ञानस्तर, कौशल्य, नीती आधारित वाढेल आणि भविष्यात आव्हाने पेलण्यासाठीच्या क्षमता त्यांच्यात येतील. थोडक्यात, निश्चित हेतू विरहित शिक्षण नसेल आणि उपयुक्तता हा महत्त्वाचा निकष असेल.

वास्तवाशी मेळ जुळणारे शिक्षण

भारतीय विद्यापीठांमधील मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या पदवीधरांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि क्षमता उद्योग, समाज यांच्या गरजा पूर्ण करणारे नसल्याने शिक्षण व्यवस्थेविषयी असमाधान आहे. त्यामुळे आगामी शिक्षण व्यवस्था उद्योग आणि समाज यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठीची गरज पूर्ण करणारे वास्तव समजून घेणारे, त्यानुसार कृती करणारे नवोपक्रमी अभ्यासक्रम प्रत्येक सत्रात नवनवे असतील.

बौद्धिकता विकासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा

भौतिक, मानवी संसाधनाच्या साहाय्याने बौद्धिकता विकासासाठी लागणारी व्यवस्था शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक होणार आहे. अगदी उदाहरण घ्यायचे असेल, तर विदा व्यवस्थापन, साठवण, विश्लेषण, संरक्षण त्यासाठीचे नवविचार, कौशल्य प्रशिक्षण, बौद्धिक हक्क निर्मिती, व्यवहारातील उपयोजन या बाबी मध्यवर्ती असणार आहेत.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…

तंत्रस्नेही प्रगत अध्ययन अध्यापन व्यवस्था

कृत्रिम बुध्दिमत्ता, आभासी वास्तविकता, संवर्धित वास्तविकता यांच्या आधारावर आशयनिर्मिती आणि त्याची प्रगततंत्र अध्यापनशास्त्राची साधने, पद्धतींद्वारे ज्ञान, कौशल्याचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात चालणार आहे. त्यामुळे अशी व्यवस्था अध्ययन व्यवस्थापन आस्थापना की ज्याद्वारे ज्ञान दारोदारीच नाही, तर हाताच्या तळव्यावर उपलब्ध होणार आहे.

लिहिणे वाचणे ऐवजी ऐकणे बोलण्याचे महत्त्व प्रगत तंत्रस्नेही साधने आणि आज्ञावलीमुळे बोललेली प्रत्येक बाब छापून, छापलेला आशय ऐकणे, तसेच शब्दातील वर्णनावरून चित्र रेखाटणे, आलेख काढणे या बाबी अत्यंत सामान्य होईल. त्यामुळे लिहिणे वाचणे यांची जागा ऐकणे, बोलणे घेणार आहे. त्यामुळे उच्चार, ऐकण्याचा कौशल्य विकसनावर भर राहणार, की ज्याद्वारे यंत्राबरोबर आंतरक्रिया करता येईल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५

विशेषज्ञ क्षेत्रांमध्ये सातत्याने बदल समाजाच्या व उदयोगांच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठीची पदवीधर तयार करण्यासाठी बदलणाऱ्या विशेष ज्ञान क्षेत्राप्रमाणे नवनवे ज्ञान व कौशल्यांची क्षेत्रे व त्याची अभ्यासक्रमे व त्यांची अंमलबजावणी ही शिक्षण व्यवस्थेची भूमिका राहणार असल्याने आयुष्यभर एकच विषय शिकवण्याचे दिवस संपणार असून उदयोन्मुख विषयांचा ठाव घेऊन अभ्यासक्रम निर्मिती व अंमलबजावणी ही शिक्षकांची बदलणारी व्यावसायिक गरज राहणार आहे. बहुविद्याशाखीय आणि बहुजणांसह ज्ञान निर्मिती एक आणि एक विषय विद्याशाखा जगातील कोणती समस्या सोडवू शकत नाही. त्यामुळे एक व्यक्ती अथवा एक विषय ऐवजी बहुविद्याशाखा आणि अनेक मेंदू एकत्र येऊन गुंतागुंतीच्या समस्या सोडवतील, त्यासाठी भौगोलिक मर्यादा नसतील यासाठी अशी मूलभूत सुविधा, कायदा आणि नियमन, संस्कृती निर्माण होऊन विश्व एकरूपता खऱ्या अर्थाने सर्वं ज्ञाननिर्मिती क्षेत्रात दैनंदिनी अनुभवात येईल. पुढे अधिकाधिक विकसित होईल.

विश्व शिक्षक आणि विश्व शिक्षण संस्था

प्रत्येक शिक्षकाला ऑनलाइन शिक्षणाद्वारे जगभरातून विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळणार आहे. त्याद्वारे विश्व अध्यापक आणि त्या संस्थ्येमध्ये जगभरातून शिकणारे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने आवडीचे, गरजेचे श्रेयांक निवडलेल्या विषयात पूर्ण करणार असल्याने विश्वगुरू आणि विश्वविद्यालय ही संकल्पना सर्वसामान्य असेल. त्यासाठी अध्यापनाचा आणि अभ्यासक्रमाचा दर्जा, गुणवत्ता ही विश्वपातळीवर स्वीकारार्ह हाईल अशा स्तरावर ठेवावी लागणार आहे. एका शिक्षकाकडे हजारो विद्यार्थी जगभरातून शिकतील. त्यामुळे शिक्षकाचा कार्यभार ही संकल्पना संपुष्टात येईल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील पुणे !

सातत्याने बदलणाऱ्या समाजाच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारे प्रगत तंत्रावर आधारित, नवनिर्मितीवर आधारित शिक्षण व्यवस्था हाच खरा भविष्यवेधी अध्ययन अध्यापनाचा मार्ग आहे. नवे शैक्षणिक धोरण २०२० आणि अध्यापकांच्या मानसिकतेतील बदल भविष्यवेध घेण्यात मोठे योगदान देऊ शकतील ही मोठी ताकदीची बाजू भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यासारख्या शिक्षणाचे केंद्र असलेल्या शहरात विद्यापीठांची संख्या वाढणार आहे. या विद्यापीठामध्ये उपरोक्त मुद्दे प्राधान्याने विचारात घेऊन अभ्यासक्रमांचे करावे लागणार आहे. याचा परिणाम पुणे शहर आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचे आशिया खंडातील परदेशी विद्यार्थ्यांसाठीचे केंद्र म्हणून पुढे येईल. पुणे शहराच्या बदलत्या स्वरुपामुळे पुणे शहराचे आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक स्वामित्व विकसनामध्ये मोठी भूमिका राहणार आहे. पुणे शहराच्या अवतीभवती असलेल्या माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना लागणारे मनुष्यबळ या प्रगत तंत्रांवर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमातून प्राप्त होणार आहे. त्यामुळे पुणे हे उच्च शिक्षण देणारे, बौद्धिक संपदा निर्माण करणारे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे प्राधान्य असणारे शहर म्हणून पुढील काळात विकसित होईल.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्र-कुलगुरू आहेत)

sonsanjeev63@gmail.com