विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि कार्यकुशलता वाढवणे, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे ‘इंडस्ट्री ॲकॅडेमिया फोरम’ची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा – पुणे : जिल्ह्यातील विशेष शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी

The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या फोरमचे उद्घाटन झाले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे, आंतरशाखीय अभ्यासमंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, कौशल्य विकास विभागाचे संचालक व वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विधी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती भाकरे, डॉ. अंजली जगताप-रामटेके, डॉ. पूजा मोरे, डॉ. रवी अहुजा, धनंजय मुंढे, अजित झेंडे, प्रियांका माने आदींसह उद्योग क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी: निगडीतील रहिवाशांचे महावितरण कार्यालयात आंदोलन ; वारंवार वीजपुरवठा खंडीत, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, कौशल्यवद्धीसाठी, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठीचे प्रयत्न इंडस्ट्री ॲकेडेमिया फोरमच्या माध्यमातून केले जातील. तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकत्रित सहभागातून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमांचे नियोजन करणे हे इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमचे उद्दिष्ट असल्याचे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रत्यक्ष उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देत उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उद्योगक्षेत्रातील उपलब्ध संधी आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांची गरज या विषयी माहिती दिली.