पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून,याप्रकरणी तिघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

याप्रकरणी एका महिलेसह सहदेव निंभोरे (रा. साकू, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), निलेश राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परीक्षा परीक्षेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संगमनेर परिसरातील एका महिलेने परीक्षा परिषदेच्या उपायुक्त कार्यालयात प्रमाणपत्र सादर केले. तपासणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. प्रमाणपत्रावर बनावट शिक्का, तसेच राठोड यांनी बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलाविले. चौकशीत आरोपी सहदेव निंभोरे, निलेश राठोड यांनी प्रमाणपत्र दिल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह निंभोरे, राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…पुण्यात लाँच झाली सीएनजी बाईक, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन! काय आहे खासियत? किती आहे किंमत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले? प्रमाणपत्राचा वापर शिक्षक भरतीत करण्यात येणार होता का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.