पुणे : महिला आयोगाकडे तक्रार करण्याची धमकी देऊन शेतकऱ्याकडून सहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया महिला वकिलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया महिला वकिलाचे नाव आहे. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेच्या जावयाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी बतावणी कांबळेने महिलेकडे केली होती. त्यानंतर कांबळेने महिलेकडून १ लाख १३ हजार उकळले आहेत. याप्रकरणात अटक करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून अटक वाँरंट बजाविण्यात येईल, अशी भीती दाखवून कांबळे हिने महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली.